लग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार!

भारतामध्ये विवाह म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. त्यामुळे या सोहळ्यावर वारेमाप खर्च केला जातो. 

Updated: Feb 16, 2017, 09:43 AM IST
लग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार! title=

नवी दिल्ली : भारतामध्ये विवाह म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. त्यामुळे या सोहळ्यावर वारेमाप खर्च केला जातो. अशा महागड्या लग्न सोहळ्यांवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसभेत याबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे. जर एखाद्या विवाहात ५ लाखाहून अधिक रुपये खर्च झाल्यास त्या कुटुंबाला विवाहासाठीच्या खर्चाच्या रकमेच्या १० टक्के दंड भरावा लागेल. 

काँग्रेस खासदार रंजीत रंजन (Compulsory Registration and Prevention of Wasteful Expenditure) Bill २०१६ यांनी या विधेयकाचा प्रस्ताव मांडलाय. लोकसभेच्या आगामी सत्रात या विधेयकावर चर्चा केली जाणार आहे.

या विधेयकानुसार जर एखाद्या कुटुंबाने लग्नासाठी ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास त्या खर्चाच्या १० टक्के रक्कम एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नावर खर्च करणे बंधनकारक असेल.