निवडणुकांत 'भाजप'नं उधळला सर्वांत जास्त पैसा!

केंद्रीय निवडणूक आयोगानं २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि इतर काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती जाहीर केलीय.

Updated: Jan 17, 2015, 11:45 AM IST
निवडणुकांत 'भाजप'नं उधळला सर्वांत जास्त पैसा! title=

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि इतर काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती जाहीर केलीय.

या खर्चात सर्वांत पुढे असणारा पक्ष आहे... सध्या सत्तेवर असलेला 'भारतीय जनता पार्टी'... लोकसभा आणि काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं तब्बल ७१४ कोटी रुपये  खर्च केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय.

तर भाजपनंतर पैसे खर्च करण्यात दुसरा क्रमांक लागलाय काँग्रेसचा... काँग्रेसने तब्बल ५१६ कोटी रुपये निवडणुकीत खर्च केलेत तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ कोटी रुपये निवडणुकीसाठी खर्च केलेत. 

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक आयोगाला दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.