३००० कोटींपेक्षा जास्त काळं धन जप्त!

केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागानं आर्थिक वर्ष २०१३ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ३००० कोटी रुपयांच्या काळ्याधनाचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर विभागानं वर्षात कर चोरी आणि काळा पैसा बाळगणारे १७४ प्रकरणे उघडकीस केले आहेत. ‘सीबीआय’ या गुन्हेगारांची अधिक चौकशी करत आहे.

Updated: Nov 27, 2013, 05:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागानं आर्थिक वर्ष २०१३ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ३००० कोटी रुपयांच्या काळ्याधनाचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर विभागानं वर्षात कर चोरी आणि काळा पैशाची १७४ प्रकरणं उघडकीस आणली आहेत. ‘सीबीआय’ या गुन्हेगारांची अधिक चौकशी करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३००० कोटींपेक्षा जास्त असलेल्या या काळ्या धनात २८६ कोटी रुपये हे सरकारी उत्पादन आणि सेवा करांच्या चोरीतून जप्त करण्यात आले आहेत. गुप्तचर संस्थेनं ८४३ सूचना अंमलबजावणी संस्थेकडून प्राप्त केल्या. सर्वात जास्त म्हणजेच ४०८ सूचना सेवाकर आयुक्तांकडून मिळाल्या. तसेच १२० सूचना महसूल संचालनालयानं उपलब्ध करुन दिल्या. सर्व प्रकरणांत समावेश असलेल्या विविध व्यक्ती आणि संस्थांकडून मिळालेलं काळं धन ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.
‘एफआयू’नं ३३ संशयित ट्रान्झॅक्शन रिपोर्ट सादर केलेत. संशयित ट्रान्झॅक्शन्सच्या सूचनांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचं काम ‘फआययू’ ही संस्थ करते. १० लाखांपेक्षा जास्त रकमेवर ट्रान्झॅक्शन रिपोर्ट सादर केला जातो. काळ्याधनाशी संबंधित गुन्ह्यांचा यामध्ये समावेश असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.