नवी दिल्ली : गोमांस बंदी सक्षमपणे लागू करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्ष भाजपचेच खासदार गोमांस खाण्याचा सल्ला देत असल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीचे भाजप खासदार उदित राज यांनी चक्क गोमांस खाण्याचं आवाहन केलं आहे. याकरता त्यांनी थेट विश्वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट याचाच संदर्भ दिला आहे.
उसेन बोल्टने बीफ खाल्ल्यामुळे तो ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्णपदके जिंकू शकला असे उदित राज यांनी ट्विटरवर म्हटलेय.
Usain bolt of Jamaica was poor and trainer advised him to eat beef both the times and he scored 9 gold medals in Olympic
— Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) August 28, 2016