नवी दिल्ली : गाझीयाबादच्या मुरादनगर येथे एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला आपल्या कंपनीतील जॉब करणाऱ्या एका मुलीशी सूत जुळलं आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेज केले.
मुलाच्या घरच्यांनी मुलीला सून म्हणून स्वीकारले. यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.
पण ही सुखद काहणी हनिमूनच्या रात्री बिघडली. पतीला लक्षात आले की त्याची पत्नी तृतीय पंथी आहे. त्या वधूला ही गोष्ट यापूर्वीच माहित होती.
मुलीच्या घरच्यांना वाटत होते की दोघांनी एकत्र राहावे पण नवऱ्या मुलाने इकार दिला. पंचायतीत हे प्रकरण गेल्यानंतर दोघांनी वेगळे व्हावे असा निर्णय घेण्यात आला.
वेगळे राहण्यासाठी मुलाच्या घरच्यांनी मुलीला काही पैसे देण्याचे कबुल केले. परंतु, किती पैसे हे अद्याप नक्की ठरले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.