बीएसएफ जवानांच्या व्हिडिओनंतर, पोस्टवरुन तडकाफडकी उचलबांगडी

जवानांच्या तोंडचा घास कोण हिरावून घेतंय? हा प्रश्न निर्माण झालाय. कारण बीएसएफ जवानाचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झालाय. जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, असा गंभीर आरोप या व्हिडिओत करण्यात आलाय. त्यानंतर या जवानांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.  प्रशासनिक बेसवरून हटवून प्लंबरची ड्युटी लावण्यात आली आहे.

Updated: Jan 10, 2017, 07:00 PM IST
बीएसएफ जवानांच्या  व्हिडिओनंतर, पोस्टवरुन तडकाफडकी उचलबांगडी  title=

नवी दिल्ली : जवानांच्या तोंडचा घास कोण हिरावून घेतंय? हा प्रश्न निर्माण झालाय. कारण बीएसएफ जवानाचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झालाय. जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, असा गंभीर आरोप या व्हिडिओत करण्यात आलाय. त्यानंतर या जवानांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.  प्रशासनिक बेसवरून हटवून प्लंबरची ड्युटी लावण्यात आली आहे.

तेज बहादूरवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप केलाय. त्यांना प्रमोशन दिले नसल्यामुळे हा प्रकार केला आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या तो अर्ज मंजूरही झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही. जवानांना चांगले अन्न दिले जाते आणि जात आहे, अशा माहिती डीआयजी एमडीएस मान यांनी दिली. दरम्यान, त्यांनी जे आरोप केला आहे. त्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, तेज बहादूरवर सातत्याने दबाव येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ काढून टाकण्यासाठी दबाव वाढत आहेत. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर या जवानांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रशासनिक बेसवरून हटवून प्लंबरची ड्युटी लावण्यात आली आहे. बेस कॅम्पवरुन हेडक्वॉर्टरवर शिफ्ट केरण्यात आले आहे.

मंत्री आणि अधिकाऱ्यांचा ज्यावेळी दौरा होतो, त्यावेळी सर्व लपविण्यात येते. खरे काहीही दाखविले जात नाही. जवानांची परिस्थिती गंभीर असते. मात्र, ते दाखविले जात नाही. वरिष्ठ सांगतात, जे मिळते ते दिले जाते. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. त्यामुळे पुढे काय येते याकडे लक्ष लागले आहे.