भारतीय बनावटीने चिनी वस्तुंना टाकले पिछाडीवर

स्वस्त किंमतींमुळे जगभरात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तुंना भारतीय वस्तुंनी पिछाडीवर टाकले आहे.

Intern - | Updated: Mar 29, 2017, 05:49 PM IST
भारतीय बनावटीने चिनी वस्तुंना टाकले पिछाडीवर  title=

मुंबई : स्वस्त किंमतींमुळे जगभरात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तुंना भारतीय वस्तुंनी पिछाडीवर टाकले आहे.

चिनी मॅन्युफॅक्चरिंग असलेल्या दुय्यम दर्जाच्या या वस्तुंना गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय बनावटीच्या वस्तुंनी खुप मागे टाकल्याने त्यांची पोलखोल झाली आहे. 

सोमवारी स्टॅटीस्टा आणि आंतरराष्ट्रीय रिसर्च ऑर्गनायझेशन डालिया यांनी संयुक्तरित्या मेड इन कंट्री इंडेक्स जाहीर केला.

त्यात युरोपीय संघांतील आणि जगभरातील जवळपास 50 देशांच्या यादीत चीन भारताच्या जवळपास 8 गुणांनी कमी आहे. भारताला त्यात 36 तर चीनला 28 गुण देण्यात आले आहेत. 

हे गुण देताना ग्राहकांची मते, गुणवत्ता, पॅकेजिंग, निर्मिती, सुरक्षा , किंमत, खास वैशिष्ट्ये, डिझाईन, विश्वासार्हता, टिकाऊपणा आणि टेक्नॉलॉजी इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या आहेत.

जगभरातील जवळपास 45,000 लोकांमध्ये हा सर्व्हे केला गेला.