कसा झाला उरी हल्ला? पाहा हल्ल्याचा घटनाक्रम

जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत, तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

Updated: Sep 18, 2016, 12:30 PM IST
कसा झाला उरी हल्ला? पाहा हल्ल्याचा घटनाक्रम title=

उरी : जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत, तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हा दहशतवादी हल्ला कसा झाला त्याच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूयात 

कसा झाला हल्ला?

पहाटे 5:00  : सीमेवरील तार कापून दहशतवादी आत घुसले

पहाटे 5:30 : उरी येथील ब्रिगेड बरॅकवर दहशतवाद्यांचा हल्ला

पहाटे 5:40 : धावपळ सुरू झाली

पहाटे 5:50 : बरॅक मधील जवानांनी शस्त्रे हाती घेतली

पहाटे 6:00 : चकमक सुरू झाली

सकाळी 7:00 : एन्काऊंटर दरम्यान काही बरॅक मध्ये आग लागली

सकाळी 7:30 : तीन दहशतवादी असल्याचे समजले

सकाळी 8:00 : पुन्हा एक दहशतवादी लपून बसल्याचे समजले

सकाळी 8:15 : जखमी झालेल्या ८ जवानांना एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये पोहचवले

सकाळी 10:10 : चार दहशतवाद्यांना ठार केलं

सकाळी 10:30 : पॅराकमांडोचे पथक घटनास्थळी पोहोचले

सकाळी 11:00 : 17 जवान शहीद झाल्याचे निष्पन्न

सकाळी 11:20 : पॅराकमांडोनी नियंत्रण आपल्या हाती घेतले