उत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं

उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.

Updated: Dec 26, 2015, 10:20 PM IST
उत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.

थंडगार वारे आणि खंडीत विजेमुळे काश्मिरमधील जनता हवालदिल झाली आहे. श्रीनगरमधील दल लेकसह परिसरातील तलाव आणि पाण्याचे स्त्रोत गोठून गेलेत.

थंडीमुळे काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. लेहमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पारा उणे 16.2 अंश सेल्सीअसवर गेलाय. श्रीनगरचं तापमान उणे 5.2 अंश से., कारगील उणे 15.0, गुलमर्ग उणे 10.2 तर पहलगामचं तापमान उणे 8.00 अंश सेल्सिअस इतकं झालंय.

शिमल्यात  बर्फवृष्टी
शिमल्यात एकीकडे बर्फवृष्टी होत असताना दुसरीकडे मात्र हिवाळी कार्निव्हलची धूम पाहायला मिळत आहे. शिमल्यातील गुलाबी वातावरणात सादर झालेल्या विविध क्रार्यक्रमांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. नृत्य, गाणी आणि कॅट वॉकने शिमल्यातील वातावरणात जल्लोष निर्माण केला. टाळ्या आणि शिट्या वाजून विविध कार्यक्रमांना लोकांनी दाद दिली.