'निर्भया' सारखा बलात्कार करण्याची काँग्रेस प्रवक्त्याला धमकी

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: May 22, 2016, 08:02 PM IST
'निर्भया' सारखा बलात्कार करण्याची काँग्रेस प्रवक्त्याला धमकी title=

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी धक्कादायक खुलासा केला आहे. तुमच्यावर निर्भयासारखा बलात्कार करुन तुमचा खून करु अशी धमकी आपल्याला ट्विटरवर आल्याचं प्रियांका म्हणाल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात केस फाईल केली असल्याचं प्रियांका यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हंटलं आहे. 

या धमक्यांमुळे मी घाबरेन असं कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे, जोपर्यंत अशा लोकांना जामीन मिळत राहील तोपर्यंत ते अशा धमक्या देतच राहतील अशी प्रतिक्रिया प्रियांका चतुर्वेदींनी दिली आहे. 

ट्विटरवर अशाप्रकारे धमक्या येतच असतात, कारण देशात अशा धमक्यांविरोधात कडक कायदा नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.