नोटबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक

मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंदीगढमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने करत सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रॅली होते आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

Updated: Nov 20, 2016, 03:30 PM IST
नोटबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक title=

चंदीगड : मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंदीगढमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने करत सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रॅली होते आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. या आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी या बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी पाण्याच्या फवा-याचा मारा करुन आंदोलकांना रोखलं.