आता महिन्याभरात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर

गृहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण आता महिन्याला तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Aug 27, 2014, 09:42 PM IST
आता महिन्याभरात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर

नवी दिल्ली : गृहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण आता महिन्याला तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
बैठकीत महिन्यात फक्त एकच सब्सिडीचं सिलेंडर दिलं जाणार हा नियम रद्द करण्यात आला आहे. वर्षभरात 12 सब्सिडी घेता येतात. तसेच महिन्यात सब्सिडीचा एकच सिलेंडर घेता येईल असा नियम करण्यात आला होता. 

मात्र तो नियम आजच्या बैठकीत रदद् करण्यात आला आहे. आता महिन्यात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर घेता येणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.