'करोडपती' कॉन्स्टेबल : बंगले, प्लॉटस्, ४ लक्झरी गाड्या आणि बरंच काही...

एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय. 

Updated: Dec 29, 2015, 03:30 PM IST
'करोडपती' कॉन्स्टेबल : बंगले, प्लॉटस्, ४ लक्झरी गाड्या आणि बरंच काही...  title=

इंदौर : एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय. 

सोमवारी, लोकायुक्त पोलिसांच्या आदेशानुसार, पोलीस कॉन्स्टेबल पदावर काम असणाऱ्या अर्जुन सिंग याच्या बँक अकाऊंट आणि तब्बल पाच घरांवर छापे मारले गेले.

यावेळी, अर्जुन सिंगकडे करोडोंचा मुद्देमाल सापडलाय. अर्जुन सिंग याच्याकडे पाच घरं, सहा प्लॉटस्, तीन लक्झरी कार आणि एक एसयूव्ही सापडली. तर त्याच्या बँक अकाऊंटमध्ये एक रिव्हॉल्व्हर, काट्रेजेस, १३२ ग्रॅम सोनं आणि दोन किलोचे चांदीचे दागिने सापडले.  

तीन महिन्यांपूर्वीच जबलपूरमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जुनची पोस्टिंग झाली होती. पण, त्यानं आपल्या नव्या ठिकाणी उपस्थितीच नोंदवली नव्हती. याबद्दल आरटीओनं भोपाळ ऑफिसकडे एक तक्रारही दाखल केली होती. 

आपल्या ३२ वर्षांच्या कार्यकाळात सिंग याची मिळकत ५० लाखांच्या घरात असली तरीही त्याची एकूण संपत्ती मात्र करोडोंच्या घरात आढळलीय.