जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. भारतीय जवानांवर नागरिकांकडून हल्लेही केले जातात. तर स्थानिक नागरिकांच्या संतापालाही सामोरे जावे लागते.
असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. यात काही काश्मीरी तरूण सीआरपीएफच्या जवानाला लाथ मारताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तरीही जवान युवकांना काहीच करत नाही, आपले कर्तव्य पूर्ण करीत आहेत.
Armed Jawan kicked by misguided youth.. do we have shame left??? pic.twitter.com/wnT21lJBfF
— Bharat Kumar April 10, 2017
या घटनेनंतर सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ बडगाम भागातील असू शकतो. हा व्हिडिओ काश्मीरात झालेल्या पोटनिवडणुकीचा असू शकतो.
सीआरपीएफनुसार जवान ईव्हीएमची सुरक्षा करत होते, त्यावेळी युवकांना उत्तर देण्यापेक्षा ईव्हीएमची सुरक्षा खूप महत्त्वाची होती. आम्ही कमकुवत नाही, पण लोकशाही वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता.