www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चार सज्ञान आरोपींवर दिल्ली इथल्या `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला सुरू आहे.
या घटनेतील सर्व आरोपींवर या नव्या कायद्यांतर्गत खटला चालविण्यात आला. या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळं त्याच्यावर बालगुन्हेगारी प्रतिबंधक कोर्टात खटला चालविण्यात आला, तर उर्वरित चार सज्ञान आरोपींवर `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला चालविण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालगुन्हेगारी प्रतिबंधक कोर्टानं तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. इतर आरोपींवर चालविण्यात आलेल्या खटल्यात एकूण १३० वेळा सुनावणी आणि साक्षी-पुरावे घेण्यात आले. तर, या आरोपींवर दरोडा घातल्याबद्दल वेगळ्या कोर्टात खटला चालविण्यात आला.
देशाला हादरा देणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींना उद्या, मंगळवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दिल्ली गँगरेप प्रकरणामुळं संपूर्ण देशभर संताप उसळला होता. नागरिकांच्या दबावामुळं सरकारला बलात्कार विरोधी कायद्यातही बदल करणं भाग पडलं होतं.
`फास्ट ट्रॅक` कोर्टाचे न्यायाधीश योगेश खन्ना यांनी या प्रकरणी १० सप्टेंबर रोजी निकाल देणार असल्याचं जाहीर केलं होतं. या खटल्याची सुनावणी तीन सप्टेंबर रोजी पूर्ण झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.