नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी 344 फिक्स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर केंद्र सरकारकडून आणलेल्या बंदीची सूचना फेटाळूण लावली आहे.
डी कोल्ड टोटल, कॉरेक्स कफ सीरप आणि विक्स अॅक्शन 500 अशा प्रकारच्या एकूण 344 औषधांवर बंदी घालण्यात आली होती. पीफिजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बल, रेकिट बेंकाइजर, सिप्ला सारख्या अनेक फार्मा कंपन्यांनी केंद्र सरकारच्या औषध बंदीच्या सूचनेवर न्यायालयात धाव घेतली होती. परंतू न्यालयाकडून केंद्र सरकारच्या सूचनेचे खंडण करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती आर. एस. अँडलॉ यांनी फार्मा कंपन्यांकडून आलेल्या 454 याचिकांचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकारकडून 10 मार्च रोजी दाखल झालेल्या याचिकेला रद्द करण्यात आले आहे. न्यायमूर्ती आर. एस. अँडलॉ यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, केंद्राला लाइसेंसिंग अथॉरिटीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही आहे.