नवी दिल्ली : पेट्रोल पंपावर जुन्या नोटा उद्यापर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. जुन्या नोटांचा स्वीकारण्याचा निर्णय तातडीने केंद्र सरकराने मागे घेतला आहे.
यापूर्वी पेट्रोल पंपावर जुन्या नोटा १५ डिसेंबरपर्यंत स्वीकारण्याचे निर्देश दिले होते. मात्र, १५ तारखेपर्यंत जुन्या नोटा चालण्याचे निर्देश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता बॅंकेतच जुन्या नोटा जमा करता येणार आहेत.
दरम्यान, हा निर्णय मागे घेण्यामागे पेट्रोल पंपावर कमिशन घेतले जात असल्याचे आढळून आले. पेट्रोल पंप कमिशन अड्डे बनल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या उद्देशाने निर्णय घेतला गेला होता, त्याला हरताळ फासण्यात आला. त्यामुळे जुन्या नोटासाठी कमिशन घेतले जात असल्याने केंद्र सरकारने जुन्या नोटांचा स्वीकारण्याचा निर्णय तातडीने निर्णय मागे घेतला आहे.