देशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता

 ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.

Updated: Jun 22, 2015, 06:09 PM IST
देशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता title=

आग्रा :  ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.

डेटॉल साबणाच्या चौकशीदरम्यान असं लक्षात आलंय की रॅपरवर 125 ग्रॅम वजन लिहीलेलं असताना त्याचं वजन 117.047 ग्रॅम इतकच भरलय. त्यामुळे कंपनीला नोटिस पाठवण्यात आली आहे. 

कोलगेट टूथपेस्टवर एक्सपायरी डेट औषध प्रशासनाच्या नियमांनुसार न लिहील्याच्या कारणावरून कोलगेटलाही नोटिस पाठवली आहे. औषध प्रशासनाच्या नियमांनुसार उत्पादनाचा महिना व वर्ष स्पष्ट स्वरूपात असणे गरजेचे आहे. 

औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चौकशी अहवाल आल्यावर या बड्या कंपन्यांना नोटिसा पाठवल्या असून पुढील कारवाई लवकरच केली जाईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.