नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट केल्याने भारतीय राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. दिग्विजय सिंह यांनी संघ प्रमुख मोहन भागवत आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या चेहऱ्यांचा एक फोटो पोस्ट केला होता.
दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून लिहलं आहे, 'धार्मिक कट्टरतेचे दोन चेहरे देशाची सामाजिक बांधिलकी उध्वस्त करतायत', काँग्रेस नेते दिग्विजय यांनी असंही लिहलंय की, हा फोटो त्यांच्या एका मित्राने त्यांना पाठवला आहे.
यावर ट्वीट करतांना म्हणजेच प्रतिक्रिया देतांना ओवैसी यांनी असं म्हटलंय, हा माझाच नाही संपूर्ण मुस्लिम समाजाचा अपमान आहे, खरंतर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपची ही छुपी युती असल्याचा आरोप औवेसी यांनी केला आहे.
The Two Perpetrators of Religious Fanaticism who are destroying Social Fabric of this Country. Image sent by a friend pic.twitter.com/8xWLg5yov6
— digvijaya singh (@digvijaya_28) September 22, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.