२६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक परेड

नवी दिल्ली : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जवान असोत की पोलीस त्यांचे प्राण पणाला लावतात.

Updated: Jan 15, 2016, 03:12 PM IST
२६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक परेड  title=

नवी दिल्ली : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जवान असोत की पोलीस त्यांचे प्राण पणाला लावतात. यात अनेकदा त्यांना मदत होते श्वानांची. २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात काश्मिरात एका मानसी नावाच्या श्वानाने आणि तिच्या ट्रेनरने दहशतवाद्यांशी लढताना प्राणांची आहुती देऊन गौरवास्पद कामगिरी केली होती.



अशीच कामगिरी अनेक श्वान दरवर्षी करतात. त्यांचा सन्मान म्हणून यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये राजपथावर एक श्वानपथक संचलन करणार आहे. येत्या वर्षी घडणारी ही घटना २६ वर्षांच्या कालावधीनंतर घडणार आहे. 

१९६० मध्ये मेरठमध्ये श्वानांसाठी एका प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली होती. इथे दरवर्षी श्वानांना आणि त्यांच्या ट्रेनर्सना बॉम्ब शोधणे, ड्रग्स शोधणे इत्यादी कारवायांसंबंधीचे ट्रेनिंग दिले जाते.



आज लष्कराकडे जवळपास विविध जातीच्या १५०० श्वानांचे पथक आहे. यातील ३६ श्वान आणि त्यांचे ट्रेनर्स राजपथावर संचलन करणार आहेत.

 

Watch #ITVideo to find about the new contingent gearing up for...

Dog squad gears up for Republic Day parade after 26 years.#ITVideo

Posted by India Today on 14 January 2016