नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संपलं. लोकसभा आणि राज्यसभेचा अधिकतर वेळ हा गोंधळातच गेला. काँग्रेस खासदारांनी अधिवेशनात पंतप्रधान मोदींवर अनेक टीका केल्या. पण आज सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आज नरमाईची भूमिका घेतली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संगळ्या खासदारांना आज सूचना दिल्या होत्या की सभागृहात कोणीही घोषणाबाजी करू नये. आज काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी वेलजवळ पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करत असताना त्यांना सोनिया गांधींनी रोखलं. त्यानंतर कोणीही पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली नाही.