दुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय

भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?

Updated: May 12, 2016, 10:56 PM IST
दुष्काळावर  भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय title=

नवी दिल्ली : भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?

दुष्काळावर मात करायचीय..? भरपूर पाऊस पाडायचाय..? वरूणराजाला प्रसन्न करायचंय...? मग यज्ञ करा  भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी सुचवलेला हा रामबाण उपाय. दुष्काळावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी यज्ञ हाच एकमेव उपाय असल्याचं ठासून सांगितलं. अगदी त्यासाठी पुराणातले दाखलेही वीरेंद्र सिंह यांनी दिले.
 
वीरेंद्र सिंह यांच्या या अफलातून उपायावर काँग्रेसनं टीकेची झोड उठवलीय. काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडकन यांनी भाजपचा समाचार घेतला. आता केवळ यज्ञ केल्यानं पाऊस पडतो, यावर तुमचा तरी विश्वास बसेल का? दुष्काळ परवडला पण असे खासदार नको, असं म्हणण्याची वेळ मात्र वीरेंद्र सिंह यांनी आणलीय.

वादग्रस्त विधान मोदींना अडचणीत आणणार?

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजपची अडचण झालीय.  आरबीआयचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन हे योग्य नाहीत. त्यांच्यामुळं देशातल्या व्याजदरात मोठी वाढ वाढ झालीय. त्यामुळं त्यांना शिकागोला पाठवा असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी यांनी केलंय. पतमानांकनाचा धोका वाढल्यानं भारतात परदेशी बँका आपल्या शाखा सुरू करण्यास कचरतात असं वक्तव्य राजन यांनी कँब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात केलं होतं. त्यावर स्वामी यांनी टीकेची झोड उठवली.