ग्रामस्थांच्या दगडफेकीमुळे अतिरेक्यांची शोध मोहीम लष्कराने थांबवली

काश्मीरच्या शोफिया भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी सुरू झालेली शोधमोहीम थांबवणं लष्कराला भाग पडलं आहे. झाईनापोरा भागातल्या हेफ गावात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच लष्करानं मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली.

Updated: May 18, 2017, 08:59 AM IST
ग्रामस्थांच्या दगडफेकीमुळे अतिरेक्यांची शोध मोहीम लष्कराने थांबवली title=

श्रीनगर : काश्मीरच्या शोफिया भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी सुरू झालेली शोधमोहीम थांबवणं लष्कराला भाग पडलं आहे. झाईनापोरा भागातल्या हेफ गावात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच लष्करानं मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली.

शेकडो जवानांनी गावाला वेढा दिला. मात्र या कारवाईला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे कोणतंही यश न मिळता ही मोहीम गुंडाळावी लागली आहे. दगडफेक करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी जवानांची आणखी कुमक मागवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कारवाईला यश आलं नाही. दगडफेकीच्या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.