मुंबई : बँकांचं हजारो कोटी रुपये कर्ज घेऊन विदेशात फरार झालेल्या विजय माल्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
ईडीने विजय माल्यांची ६६३० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. विजय माल्या सध्या परदेशात आहे.
पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने ही कारवाई केली आहे. याआधी ईडीने विजय माल्या यांची १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरु मधल्या संपत्तीवर ही कारवाई करण्यात आली आहे.