विमानात झाली डिलीव्हरी, मुलीला आयुष्यभर विमान प्रवास मोफत

दुबईहून फिलिपाईन्स जाणाऱ्या एका महिलेने विमानातच मुलीला जन्म दिला. रिपोर्टनुसार, महिलेची डिलीव्हरी ऑक्टोबरमध्ये होणार होती. मात्र दोन महिनेआधीच तिने विमानात बाळाला जन्म दिला. 

Updated: Aug 20, 2016, 04:13 PM IST
विमानात झाली डिलीव्हरी, मुलीला आयुष्यभर विमान प्रवास मोफत title=

नवी दिल्ली : दुबईहून फिलिपाईन्स जाणाऱ्या एका महिलेने विमानातच मुलीला जन्म दिला. रिपोर्टनुसार, महिलेची डिलीव्हरी ऑक्टोबरमध्ये होणार होती. मात्र दोन महिनेआधीच तिने विमानात बाळाला जन्म दिला. 

यामुळे विमानाचे इर्मजन्सी लँडिंग करावे लागेल. हैराण करणारी गोष्ट म्हणजे जन्माला आलेल्या मुलीला विमान कंपनीने गिफ्ट म्हणून आयुष्यभर विमान प्रवास मोफत देण्यात येणार आहे. 

दोन महिन्यांनंतर तिची डिलीव्हरी होणार होती. मात्र विेमानात तिला प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्याचदरम्यान, विमानात दोन नर्स होत्या. त्यांच्या मदतीने विमानाच्या एका केबिनमध्ये तिची डिलीव्हरी करण्यात आली.