सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली

सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे.

Updated: Aug 20, 2016, 01:44 PM IST
सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला, चांदी मात्र घटली  title=

नवी दिल्ली : सोन्याचा भाव प्रतीतोळा 100 रुपयांनी वाढला आहे. सोन्याचे दर आता 31,250 रुपये प्रती 10 ग्रॅम एवढा झाला आहे. एकीकडे सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावामध्ये मात्र 185 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे भाव आता 46,465 रुपये प्रतीकिलो झाले आहेत. 

दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे भाव 31,250 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे भाव 31,100 रुपये प्रतीतोळा झाले आहेत.