close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत

उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा  बदलून मिळणार नाहीत

Updated: Nov 24, 2016, 08:03 PM IST
उद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा  बदलून मिळणार नाहीत पण या नोटा जमा करता येणार आहेत. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जुन्या नोटा बँक आणि पोस्टामध्ये जमा केल्यानंतर आधी चार हजार मग साडेचार हजार आणि त्यानंतर अडीच हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयामुळे आता नागरिकांना पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी उद्यापासून वेगळी रांग लावावी लागणार आहे.