यमुना एक्स्प्रेस हायवे अपघात प्रकरणी नवा खुलासा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीचा शनिवारी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला.

Updated: Mar 7, 2016, 11:19 PM IST
यमुना एक्स्प्रेस हायवे अपघात प्रकरणी नवा खुलासा title=

नवी दिल्ली: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीचा शनिवारी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला. या अपघातामध्ये नोएडामधील डॉक्टर नागर यांचा मृत्यू झाला. स्मृती इराणींनी मदत केली असती तर माझे वडिल वाचले असते असा दावा या मृत्यू पावलेल्या डॉक्टरच्या मुलीनं केला. 

पण आता याबाबत एका प्रत्यक्षदर्शीनं आणखी एक खुलासा केला आहे. अपघात झाल्यानंतर स्मृती इराणी गाडीबाहेर आल्या, आणि त्यांनी ताबडतोब मदतीसाठी फोन केले, आणि 10 मिनीटांमध्ये ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली, असं या प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे.