शेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर

शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.

Updated: May 9, 2013, 03:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पटना
शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.
बिहारच्या भोजपुर जिल्ह्याच्या १३ वर्षीय सत्यमने जेईई ही प्रवेश परिक्षेत २९२ गुण मिळवून एक आगळ-वेगळा इतिहास रचला आहे. भोजपुर जिल्ह्यातील बखोरापुर गावतले सर्वसामान्य शेतकरी सिद्धनाथ सिंह यांचा मुलगा सत्यम ही परीक्षा कमी वयात उत्तीर्ण झाला आहे. सत्यमचे वडील शेतकरी असून आई प्रमिला गृहिणी आहे.
देशातील प्रमुख इंजिनीअरींग संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ही परिक्षा पास व्हावी लागते. त्यात एका शेतकऱ्याच्या मुलाने चांगले गुण मिळवून इतिहास रचला आहे असं बोलणं वावगं ठरणार नाही. मुलाच्या या यशाचे कौतुक करताना सत्यमचे वडील म्हणतात की, ‘लहानपणापासूनच सत्यमची कुशाग्र बुद्धी आहे. तो राजस्थानमधील कोटामध्ये त्याच्या काकांसोबत राहून तिथेच अभ्यास करत असे. देवाच्या कृपेमुळे त्याला हे उत्तुंग यश मिळालं आहे.’

गेल्या वर्षीही त्याने भारतीय प्रोद्योगिक संस्थान (आयआयटी) ची प्रवेश परिक्षा दिली होता. त्यात त्याचा ८१३७वा नंबर मिळवला होता. चांगला नंबर न आल्याने त्याने ही परिक्षा परत एकदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच तो जूनमध्ये होणाऱ्या एडवांस परिक्षाही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होईल अशी सत्यमच्या वडीलांना आशा आहे. सत्यमला त्याच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनीही सन्मानित केले.