FCI मध्ये ७,००० कर्मचाऱ्यांची होणार भरती

भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) योजनेअंतर्गत ७००० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 2, 2013, 03:15 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) योजनेअंतर्गत ७००० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यावरील तृतीय श्रेणीमध्ये ६५४५ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापूर्वीही ३८०० कर्मचाऱ्यांची नकरण्यात आली होती. एफसीआयचे कार्यकारी निर्देशक डी व्ही देवेंद्र यांनी म्हटलंय, हा एफसीआयचा मोठा उपक्रम आहे. कर्मचारी चयन आयोग एसएससीच्या प्रथम टप्प्यात तृतीय श्रेणीमध्ये ३७५५ रिक्त जागा भरण्यात आल्या. तसे उमेदवारांना ऑफर लेटरसुद्धा क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर काढण्यात काढण्यात आलीत.

दुसऱ्या प्प्यावरील तृतीय श्रेणीमध्ये ६५४५ रिक्त पदांसाठी भरती चालू आहे. या पदांसाठी एसएससीद्वारा लेखी परीक्षा ठेवण्यात आली आहे आणि नियुक्ती पत्र पाठवण्यापूर्वी उरलेल्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त एफसीआयने व्यवस्थापन वर्ग २ मधील ४६० रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. लवकरच त्यातील असिंस्टंट डायरेक्टरेच्या एका जनरल पोस्टसाठी जाहिरात करण्याची योजना लवकरच अमलात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.