पाहा हत्तीणीचा आपल्या नवजात बाळासह खड्ड्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष

कोईंबतूरमध्ये एका हत्तीणीनं आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळाची आणि स्वत:ची मोठ्या खडड्यातून सुटका करून घेतली. माय लेकाची खड्डयातून बाहेर पडण्याची धडपड कॅमेऱ्यात कैद झालीय. 

ANI | Updated: Oct 26, 2015, 11:05 AM IST
पाहा हत्तीणीचा आपल्या नवजात बाळासह खड्ड्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष title=

कोईंबतूर: कोईंबतूरमध्ये एका हत्तीणीनं आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळाची आणि स्वत:ची मोठ्या खडड्यातून सुटका करून घेतली. माय लेकाची खड्डयातून बाहेर पडण्याची धडपड कॅमेऱ्यात कैद झालीय. 

आणखी वाचा - एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

हत्तीणीला आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळासह खडड्याच्या बाहेर पडायचं होतं. अनेकदा प्रयत्न करून सुध्दा तिला काही बाहेर पडता येत नव्हतं. मात्र बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न तिने काही सोडले नाही. बराच वेळ ती आपल्या पिल्लासह बाहेर पडण्यासाठी ही अशी धडपडत होती. त्यांचा हा बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

आणखी वाचा - पाहा हत्तीच्या पिलाची सुटका

जो तो त्यांचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक होता. अखेर हत्तीणीच्या प्रयत्नाला यश आलं आणि तिनं तिच्या पिल्लासह खडड्याच्या बाहेर सुखरुप पडण्यात यश मिळवलं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.