तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

ANI | Updated: Oct 26, 2015, 11:10 AM IST
तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली title=

कराची: पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

आणखी वाचा - पाकिस्तानात राहणारी गीता भारतात आपल्या घरी परतणार

गीता जेव्हा सात किंवा आठ वर्षांची होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती १५ वर्षांपूर्वी लाहोर रेल्वे स्टेशनवर समझौता एक्सप्रेसमध्ये एकटी बसलेली सापडली होती. पोलिसांनी तिला लाहोरच्या चॅरिटेबल ट्रस्ट 'इदी फाउंडेशन'जवळ सोडलं होतं. नंतर ती कराचीमध्ये एका आश्रमात राहत होती.

आणखी वाचा - पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची गीता

२३ वर्षीय गीता १० वर्षांहून अधिक काळ इदी फाउंडेशनच्या आश्रमात राहिली. इदी फाउंडेशनच्या फहद इदी यांनी सांगितलं की, गीता सोमवारी सकाळी पीआयएच्या विमानानं नवी दिल्लीसाठी रवाना होईल. तिच्यासोबत मी, माझे वडील फैसल इदी, आई आणि आजी बिलकीस इदी असतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.