मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेले पाच जवान शहीद झाले आहेत.

Updated: Jan 30, 2017, 08:29 PM IST
मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश  title=

श्रीनगर : माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेले 5 जवान शहिद झालेत, यामध्ये महाराष्ट्राच्या तीन सुपुत्रांचा समावेश आहे. सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे सुपुत्र या हिमस्खलनात शहिद झालेत.

28 जानेवारीला माछिलमध्ये झालेल्या हिमस्खलानात हे पाच जवान बर्फाखाली गाडले गेले होते. खराब हवामानामुळे या जवानांना शोधण्यात अडचणी येत होत्या. अथक प्रयत्नांनंतर या जवानांना शोधण्यात यश आलं होतं. या पाचही जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र या जवानांची मृ्त्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.

या शहिद जवानांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी नेण्यात आलं असून मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 28 जानेवारीला जम्मू काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात 15 जवान शहीद झाले होते, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा समावेश होता.