बंगळूरु : महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढतायत. वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढतात.
मात्र हुबळीमध्ये असे एक कँटीन आहे जेथे गेल्या सहा वर्षांपासून केवळ एक रुपयांत जेवण दिले जाते. हल्लीच्या जमान्यात एक रुपयाला काहीच किंमत नाही. मात्र हुबळीमधील रोटी घर हे कँटीन याला अपवाद आहे.
या रोटी घरमध्ये गेल्या ६ वर्षांपासून एक रुपयांत लोकांना जेवण दिले जात आहे. सणाच्या दिवशी जेवणात स्वीट डिशही दिली जाते. ज्यांना पैशाअभावी एक वेळचे जेवण मुश्किल असते अशा लोकांसाठी रोटी घर खरंच एक वरदान ठरतेय.
Karnataka: For the past 6 years, a canteen in Hubli, Roti Ghar, serves lunch for just Rs 1. pic.twitter.com/PoTIot0XfP
— ANI (@ANI_news) 18 January 2017