माजी आमदार आहे, पण बेघर आहे

 आमदार आणि बेघर असं शक्यच होणार नाही, कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील एक माजी आमदार आज बेघर आहे, त्याच्याकडे स्वत:चं घर नाही. कर्नाटकातील बाकिला हुक्रप्पा १९ महिने आमदार होते, मात्र हुक्रप्पांकडे स्वतःचे घरही नाही.

Updated: Jun 13, 2016, 01:04 AM IST
माजी आमदार आहे, पण बेघर आहे title=

कन्नडा :  आमदार आणि बेघर असं शक्यच होणार नाही, कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील एक माजी आमदार आज बेघर आहे, त्याच्याकडे स्वत:चं घर नाही. कर्नाटकातील बाकिला हुक्रप्पा १९ महिने आमदार होते, मात्र हुक्रप्पांकडे स्वतःचे घरही नाही.

राजकारणात प्रवेश केलेली व्यक्ती कितीही गरीब परिस्थितीतील असली तरी काही काळाने तो श्रीमंत होतो. राजकारणात छोट्या छोट्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींची काही काळानंतर करोडपती होतात.

बाकिला हुक्रप्पा यांनी दक्षिण कन्नडा जिल्ह्यातून १९८३ मध्ये १९ महिने आमदारकी भुषवली. काही परदेश दौरेही केले. मात्र मागील २१ वर्षे ते आपल्या पत्नीच्या घरात राहत आहेत. माजी आमदार म्हणून त्यांना मिळणाऱ्या पेंशनवर त्यांची उपजीविका चालू आहे. ते आता शेती करतात.