अध्यक्षीय भाषणात सदानंद मोरे परखड भूमिका मांडणार?

घुमान इथं होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलयं. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन होणं अपेक्षित असतं. प्रबोधनाची परंपरा असलेल्या घुमानमधून समाजाला आणि राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावण्याचं धाडस डॉ. मोरे करतील का हाच खरा सवाल आहे.

Updated: Apr 3, 2015, 09:51 AM IST
अध्यक्षीय भाषणात सदानंद मोरे परखड भूमिका मांडणार? title=

घुमान : घुमान इथं होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलयं. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन होणं अपेक्षित असतं. प्रबोधनाची परंपरा असलेल्या घुमानमधून समाजाला आणि राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावण्याचं धाडस डॉ. मोरे करतील का हाच खरा सवाल आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं व्यासपिठ म्हणजे आहे एक परंपरा. याच व्यासपिठावरुन साहित्यिकांनी आपली भूमिका मांडून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणिबाणीत दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलननाच्या व्यासपिठावरुनच सरकारच्या दडपशाहीचा विरोध केला. साहित्यिकांकडून निर्भिड वर्तनाची अपेक्षा असते. कुठल्याही दबावाला न जुमानता तो साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुनच समाजहितासाठी काही रोखठोक भूमिका घेणं अपेक्षित असतं. 

यावेळी घुमान इथं होत असलेल्या साहित्य  संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. संत साहित्याची परंपरा, संत तुकारामांच्या देहूचा वंशपरंपरागत आलेला  वारसा, पुरोगामी आणि प्रगतीशिल विचारवंत अशी महाराष्ट्राला असलेली ओळख म्हणजे डॉ. सदानंद मोरे... आपल्या  अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे काय भूमिका मांडतात ते पाहणं त्यामुळचं महत्त्वाचं ठरणार आहे. धर्म, जाती, आणि भाषा यांची विविधता असलेल्या भारतात विविधता जपतांनाच राष्ट्रीय आणि  सामाजिक ऐक्य जपण्याचं आव्हान आहे हे डॉ. मोरेंनी नमूद केलं आहे. समाजातला संवाद टिकवण्यासाठी संत नामदेवांनी प्रयत्न केले. पण आता मात्र हा संवाद खुंटतो आहे की काय असं वाटतं आहे. त्यामुळेच डॉ. मोरे आपल्या अध्यक्षीय भाषणात या विषयी बोलणार का? 

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कोण? त्यांना कधी पकडणार?

  • गोविंद पानसरेंची हत्या कोणी केली? आरोपी मोकाट कसे?

  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दूरावस्थेला जबाबदार कोण?

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांना कसे रोखणार? 

दाभोलकरांची हत्या झाली, आरोपी पकडले गेलेले नाहीत. त्यापाठोपाठ गोविंद पानसरेंची हत्या झाली. आरोपी मोकाटच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा संकोच होत असतांनाच  राज्यातील बळीराजाही संकटात सापडला आहे. असे अनेक  प्रश्न सध्या भेडसावताहेत.साहित्य हे जगण्यापासून वेगळे राहू शकत नाही. त्यामुळेच ८८ व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य  संमेलनाच्या व्यासपीठावरुन अध्यक्षीय भाषण करतांना घुमान इथं डॉ. सदानंद मोरेंनी रोखठोक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.