नवी दिल्ली : देशाला लष्कराचा स्वतंत्र कारभार पाहणारा संरक्षण मंत्री लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ नोव्हेंबरपासून परदेश दौरा आहे, त्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तेव्हा देशाच्या नव्या संरक्षण मंत्र्यांना शपथदिली जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सध्या केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्याकडे आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे देशाचं संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवला जाण्याची दाट शक्यता आहे.ॉ
आयआयटीएन असलेल्य़ा मनोहर पर्रिकरांच्या प्रशासनावर जोरदार पकड असून देशातील महत्वाचं संरक्षण खातं सांभाळण्याची क्षमता देखिल आहे, क्लिन इमेज असल्याने मनोहर पर्रिकर यांना केंद्रात बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगलीच जवळीक असल्याचंही सांगण्यात येतं. भाजपकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे आलं त्यावेळी पर्रिकर यांनी मोदींच्या नावाला सकारात्मक वातावरण असल्याचं सांगितलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी डझनभर मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.