राजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे

राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.   

Updated: Dec 10, 2016, 03:27 PM IST
राजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे title=

टोंक : राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.   

पुरातत्व विभागाच्या टीमनं अनेकदा या भागाचा दौरा केलाय. संपूर्ण अहवाल लवकरच सरकारला पाठवला जाणार आहे. या भागात ज्यांना सोन्याचे नाणे सापडलेत त्यांना ते जमा केले तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आवाहन पोलिसांनी केलंय. जर पोलिसांना हे नाणे सापडले तर त्या व्यक्तीविरोधात खटला दाखल केला जाईल. 

हे सोन्याचे नाणे पुरातत्व विभागाची संपत्ती आहे... त्यावर नागरिकांचा कोणताही अधिकार नसल्याचं पोलीस माईकवर ओरडून ओरडून सांगत आहेत.