सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक

जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

PTI | Updated: Mar 8, 2015, 05:56 PM IST
सोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक title=

नवी दिल्ली: जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.

तसंच औद्योगिक क्षेत्र आणि नाणे निर्मात्यांद्वारे मागणी कमी झाल्यानं चांदीचे दरही खाली आले आहेत. होळीनिमित्त पाच आणि सहा मार्चला बाजार बंद होता. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं की, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांच्या कमी मागणीमुळे आणि जागतिक बाजारातील मंदीमुळे हे बहुमूल्य धातूंची मागणी कमी राहिली. 

सिंगापूर बाजारात सोन्याचे दर कमी होऊन ११६८.७० डॉलर आणि चांदी १५.९३ डॉलर प्रति औंस राहिले. दिल्लीत ९९.९ शुद्ध सोन्याचा भाव दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांकडे क्रमश: २७,३०० रुपये आणि २७,१०० रुपये प्रति १० ग्राम एवढा चांगला दर सकाळी मार्केट सुरू झाला तेव्हा होता. पण नंतर जागतिक बाजारातील मंदीमुळे दर कमी होत अखेर ५८० रुपयांनी कमी होत मागील तीन महिन्यांमधील सर्वात कमी दरावर मार्केट बंद झालं. बंद होतांना ९९.९ शुद्ध सोन्याचा भाव दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांकडे क्रमश: २६,५४० रुपये आणि २६,३४० रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाले. 

तर चांदीचे दर ९०० रुपयांनी कमी होत ३६३०० रुपयांवर आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.