नवी दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन वकिलांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या वकिलांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
बीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर सुमारे मध्यरात्री हा निर्णय घेण्यात आला. एम.एल. शर्मा आणि ए.पी. सिंग या दोघांनी बीबीसी वाहिनीच्या वृत्तपटात महिलांविरोधी आणि त्यांचा अवमान करणारी वक्तव्ये केल्याच्या आरोपांवरून ही नोटीस जारी करण्यात आली.
प्राथमिकदृष्ट्या या वकिलांविरोधात व्यायसायिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप असल्याचे समितीने नमूद केले. या नोटीसीला समाधानकार उत्तर न दिल्यास या दोन्ही वकिलांची सनद रद्द होण्याची शक्यता आहे.
मात्र, दुसरीकडे, वकील शर्मा यांनी आरोप फेटाळत आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचा दावा केला.
'बीबीसी'च्या 'इंडियाज डॉटर' या वादग्रस्त वृत्तपटात एम एल शर्मा यांनी 'जर कोणतीही मुलगी सुरक्षेशिवाय बाहेर पडली तर त्यांच्यासोबत अशा घटना होणारच' असे वक्तव्य केले असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.