सोने-चांदीचा काय आहे दर?

गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2013, 02:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याने बाजारात खरेदीला उत्साह दिसून आला. गेल्या आठवड्यात सोने-चांदी दराच्या घडामोडींवर लक्ष लागले होते. ३२ हजार रूपयांवर पोहोचलेले सोने २९ हजारांवर आले. दुसऱ्या दिवशी यात घट होवून २८,६०० पर्यंत प्रति तोळा दर खाली आला. सातत्याने दरात घट होवून तो २७,००० रूपयांपर्यत खाली आला. मुंबईत सोन्याचा दर २६,३९५ प्रति तोळा आहे.
जागतिक बाजारातील मंदी कमी झाल्याने त्याचा सोने दरावर परिणाम दिसून आलाय. आंतरराष्ट्र बाजातार सोन्याच्या घटलेल्या किंमतीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोने प्रति तोळा २६,०६९ बाजार भावाने विक्री केले गेले.

मुंबईत ९९.५ प्रति शुद्ध आणि ९९.९ प्रति शुद्ध सोन्याची किंमत प्रति तोळा अनुक्रमे २६,२६० आणि २६,३९५ होती. तर चांदीचा दर किलोला ४६,१२५ होता तो ४५,६६५ वर खाली येताना ४६० रूपयांची घट दिसून आलीय.

चेन्नईमध्ये सोने बाजार २६,३७० रूपयांवर बंद झाला. प्रति तोळा २६,५५५ मध्ये १८५ रूपयांची वाढ झालेली दिसून आली. तर चांदी ४४९१५ रूपये प्रति किलो होती. तिच्यामध्ये ३६५ घट होऊन दर ४४५५० रूपये झालाय.

दिल्लीत शुद्ध सोने १० ग्रॅमसाठी २७,१०० आणि २६,९०० या दरात विक्री होत होती. मात्र, यात ५०० रूपयांनी घट होऊन आठ ग्रॅम तुकडा सोन्याला २४,००० रूपये भाव होता. तर चांदीमध्ये १०० रूपयांनी घट होऊन प्रति किलो ४५,३०० रूपयांवरून ४३,२०० वर दर आला. आठवड्याच्या शेवटी चांदीचा दर होता ४३,३०० रूपये.

मुंबई
सोने - 26395 , चांदी - 45665 (-460)
दिल्ली
सोने - 27100 (+500), चांदी - 45300 (-100)
चेन्नई
सोने - 26555 (185) , चांदी - 44480 (-365)
कोलकाता
सोने - 27385 (685), चांदी - 46,500 (400)
बंगळुरू
सोने - 26885 (137), चांदी - 45800 (400)
अहमदाबाद
सोने - 25,525, चांदी - 44,000