नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली. मुंबईतही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. मुंबईत दहा ग्रॅमला (प्रति तोळा) 27,920 रुपये दर आहे.
22 कॅरेटे सोने दर 26100 रुपये तर 24 कॅरेटला 27,920 रुपये इतका आहे. दि. 1 सप्टेंबरला 22 कॅरेटला 26,250 रुपये तर 24 कॅरेटला 24040 रुपये दर होता. गेल्या तीन दिवसात सोने किमतीत घसरण पाहायला मिळला. सनासुदीत सोने मागणीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम सोने बाजारात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दिल्लीत सोन्याचा भाव 155 रुपयांनी कमी होऊन 28,200 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सोन्याच्या भावाची ही एक आठवड्याची नीचांकी पातळी आहे. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने सराफ्यात मंदी दिसत आहे. तर चांदीमध्येही घसरण झालेचे दिसत आहे. चांदी प्रति किलो 42, 700 रुपये आहे.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, सणासुदीचा काळ असतानाही जागतिक बाजारातील कमजोर स्थितीमुळे सोने-चांदीला उठाव मिळत नाही. त्यामुळे भाव कमी झालाय. तसेच सोने गुंतवणुकीकडे लोकांचा कल बदल्याचे दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.