नवी दिल्ली : वैश्विक बाजारात कमकुवत ट्रेंडमुळे सट्टेबाजांनी आपले सौद्यात कपात केली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतीत ४०५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २९११० रुपये झाला आहे.
एमसीएक्समध्ये सोन्याची एप्रिल डिलीव्हरीच्या करारामध्ये किंमत ४०५ रुपये किंवा १.३७ टक्के कमी होऊन २९११० ग्रॅम झाला आहे. त्यामुळे ७९९ लॉटमध्ये व्यवहार झाला. तसेच सोन्याची जून महिन्यातील डिलिव्हरी अनुबंदच्या किंमती ३९० अथवा १.३१ टक्के घट आली त्यात किंमत २९,३९० रुपये प्रति ग्रॅम झाला, त्यात २२ लॉटमध्ये व्यवहार झाला.
बाजारातील विश्लेषकांच्यामते सोन्याचा वायदे बाजारातील किंमतीतील घट वैश्विक बाजारातील कमकुवत ट्रेंडनुसार कमी झाल्या आहेत. सिंगापूरमध्ये आज सोन्याची किंमत ०.३ टक्क्यांनी कमी झाली, १२२३.६७ डॉलर प्रति औंस असणार आहे.