महिला दिनी सोन्याच्या भावात घसरण

महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी एक खुशखबर आहे.

Updated: Mar 8, 2017, 06:17 PM IST
महिला दिनी सोन्याच्या भावात घसरण title=

नवी दिल्ली : महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी एक खुशखबर आहे.

आंतराष्ट्रीय बाजार आणि स्थानिक विक्रेत्यांच्या मागणीतील कमतरतेमुळे आज सोन्याच्या भावात ५० रुपयांची घट झाली.

सोन्याचा भाव सध्या प्रति ग्रॅमला (तोळ्याला) २९,५०० रुपये आहे. त्याचसोबत चांदीची किंमतही ४०० रुपयाने घटली आहे. आता चांदी ४२,१०० रुपये प्रतिकिलो आहे. 

तसंच सध्या लग्नाचा सिझन नसल्याने घरगुती सोनं खरेदी किंवा दागिन्यांची खरेदी होत नाहीये. भाव उतरण्याचं हे एक कारण असल्याचं सोने व्यापारींकडून सांगितलं जातंय.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे भाव उतरून अनुक्रमे २९,५०० आणि २९,३५० झालाय.