नवी दिल्ली : झाकीर नाईक यांच्या IRF या संस्थेंवर ५ वर्षासाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने IRF या संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या पैशांबाबत कारवाई सुरु केली होती. त्यामुळे झाकीरच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द होणार की काय अशी शक्यता होती.
ज्या कामांसाठी या संस्थेला पैसे मिळत होते ते काम या संस्थेमार्फत होत नव्हतं. त्यामुळे या संस्थेचं कारवाई होणार असल्याची माहिती होती. त्यानंतर आता सरकारने या संस्थेवर ५ वर्षाची बंदी केली आहे.