दीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...

कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. 

Updated: Dec 12, 2015, 08:51 AM IST
दीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार... title=

नवी दिल्ली : कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. 

कांद्याचं निर्यातमूल्य हे प्रति टन ७०० वरून ४०० डॉलर्सवर आणलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखालील गटानं हा निर्णय घेतलाय.

त्यामुळं आता शेतकरी ४०० डॉलर प्रति टन या मूल्यानंही कांदा निर्यात करु शकतील. तसंच हे मूल्य दर दोन आठवड्यानं बदलणार आहे.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील आवक प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास देशांतर्गत बाजारपेठेचा आढावा घेऊन हे दर ठरविण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाची आणि खासदारांनी संसदेसमोरील आंदोलनाची दखल घेत केंद्रानं तातडीने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.