...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद

जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

Updated: Dec 20, 2016, 09:28 PM IST
...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद title=

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

दोन सरकारी विभागाच्या आपापसातील करारामध्ये टॅक्स अधिकारी अशा सर्व लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर अशा लोकांची सबसिडी बंद होऊ शकते. काही लोकांनी याआधीच स्व इच्छेने सबसिडी सोडली आहे. पण अजून ही असे अनेक लोकं आहेत ज्यांनी सबसिडी सोडलेली नाही. 

सरकार या संबंधी स्वत: चौकशी करणार आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या एका वर्षला सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जात आहे. सरकारने उत्पन्न अधिक असलेल्या व्यक्तींना सबसिडी सोडण्यासाठी याआधी आवाहन केलं होतं.