'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा'

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.

Updated: Apr 12, 2015, 02:43 PM IST
'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा' title=

जिंद : हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.

याबरोबरच साध्वी ठाकूर यांनी मशिद आणि चर्चमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती लावल्या पाहिजेत, अशी मागणीही केली आहे. हरियानात नथुराम गोडसे यांचे देशभक्त म्हणून छायाचित्र लावण्याचेही त्यांनी समर्थन केले आहे. हरियानातील जिंद येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना साध्वी ठाकूर यांनी हे वक्तव्य केले.

साध्वी म्हणाल्या, 'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या वर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करून त्यांची नसबंदी करायला हवी. यामुळे त्यांची लोकसंख्या वाढणार नाही. हिंदू नागरिकांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे. यामुळे जगावर हिंदूंचा प्रभाव राहिल.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.