'हिटलर आणि मुसोलिनीही ब्रॅण्ड होते'

गांधींमुळे खादी उद्योगाची दुर्दशा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खादीला चांगले दिवस आले.

Updated: Jan 14, 2017, 11:08 PM IST
'हिटलर आणि मुसोलिनीही ब्रॅण्ड होते' title=

नवी दिल्ली : गांधींमुळे खादी उद्योगाची दुर्दशा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खादीला चांगले दिवस आले. महात्मा गांधींपेक्षा मोदी हे मोठे ब्रॅण्ड आहेत, असं धक्कादायक वक्तव्य हरियाणाचे भाजपचे मंत्री अनिल विज यांनी केलं होतं. अनिल विज यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी खरपूस समाचार घेतला आहे. 

हिटलर आणि मुसोलिनीही ब्रॅण्ड होते, अशी टीका करणारं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. हा वाद अंगलट आल्यानंतर अनिल विज यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजपवरही यावरून टीका झाल्यानंतर विज यांचं हे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे.