www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नव्या वर्षात म्हणजेच २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची सेन्चुरीच मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुट्ट्यांची यादीप्रमाणे २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांना तब्ब्ल १०१ सुट्ट्या मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारशी जोडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या लागू होतील.
नव्या वर्षात चार मोठ्या सुट्ट्या रविवारी येत असल्या तरी २०१३ पेक्षा येत्या वर्षात या कर्मचाऱ्यांना चार सुट्ट्या अधिक मिळणार आहेत.
सरकारी सुट्ट्या पुढीलप्रमाणे…
१ जानेवारी – नवं वर्ष (RH)
७ जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती (RH)
१४ जानेवारी – ईद-ए-मिलाद (GH), मकर संक्रांती (RH), पोंगल (RH)
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (GH)
४ फेब्रुवारी – वसंत पंचमी (RH)
१४ फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती (RH)
१९ फेब्रुवारी – शिवाजी जयंती (RH)
२४ फेब्रुवारी - स्वामी दयानंद सरस्वती जयंती (RH)
२७ फेब्रुवारी - महाशिवरात्री (RH)
१६ मार्च – होळी (RH)
१७ मार्च – धुलिवंदन (GH)
३१ मार्च – गुडीपाडवा (RH)
८ एप्रिल – राम नवमी (GH)
१३ एप्रिल – महावीर जयंती (GH)
१४ एप्रिल - वैशाखी (RH)
१५ एप्रिल – वैशाखडी (बंगाल) / बेहाग बिहू (आसाम) (RH)
१८ एप्रिल – गुड फ्रायडे (GH)
२० एप्रिल – ईस्ट संडे (RH)
९ मे - गुरु रविंद्रनाथ जन्मदिवस (RH)
१३ मे – हजरत अली जन्मदिवस (RH)
१४ मे – बौद्धपौर्णिमा (GH)
२९ जून - रथ यात्रा (RH)
२५ जुलै - जमात-उल-विदा (RH)
२९ जुलै - ईद-उल-फित्र (GH)
१० ऑगस्ट - रक्षाबंधन (RH)
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन (GH)
१८ ऑगस्ट – जन्माष्टमी (GH)
२९ ऑगस्ट - गणेश चतुर्थी (RH)
७ सप्टेंबर – ओणम (RH)
२ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती (GH)
३ ऑक्टोबर – दसरा (GH)
६ ऑक्टोबर - ईद-उल-जुहा (GH)
८ ऑक्टोबर - महावीर वाल्मिकी जयंती (RH)
११ ऑक्टोबर – करवाँ चौथ (RH)
२३ ऑक्टोबर – दिवाळी (GH)
२४ ऑक्टोबर – गोवर्धन पूजा (RH)
२५ ऑक्टोबर – भाऊबीज (RH)
२९ ऑक्टोबर – छठ पूजा (RH)
४ नोव्हेंबर – मोहरम (GH)
६ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती (GH)
२४ नोव्हेंबर - गुरु तेगबहादूर पुण्यतिथी (RH)
२५ डिसेंबर – ख्रिसमस (GH)
२८ डिसेंबर - गुरु गोविंद सिंह जयंती (RH)
( GH - Gazetted Holiday, RH - Restricted Holiday)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.